एसटी वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सोमवारी (ता. 23) राज्य सरकारने उच्चाधिकार समिती स्थापना केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही समिती 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतन सुधारणेबाबत विचार करून 22 डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करेल.

या समितीमध्ये परिवहन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त आणि कामगार आयुक्त यांचा समावेश आहे. या संदर्भातील सरकारी अध्यादेश आज जारी करण्यात आला.