पायाभूत, नैदानिक चाचणी वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - एकाच वेळी दोन परीक्षा ठेवल्याने विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पायाभूत व नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता 18 ते 22 ऑगस्टदरम्यान या परीक्षा होतील. याबाबत शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले. दुसरी ते आठवीसाठी पायाभूत चाचणी आणि नववीसाठी नैदानिक चाचणी घेण्यात येणार होती. या परीक्षा 16 ते 23 ऑगस्टदरम्यान होत्या. या परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांत होणार होत्या. आता 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्टदरम्यान या परीक्षा होतील. त्यानंतर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील.