प्लास्टिक बाटल्यांपासून  फिफाची कलाकृती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - कचऱ्यातील प्लास्टिकच्या बाटल्यांपासून महापालिकेने फिफाची कलाकृती बनवली आहे. ‘रिसायकलेडेलिक फिफा म्युरल’ असे याचे नाव आहे. रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या व झाकणांपासून हे शिल्प तयार करण्यात आली आहे. यातून फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धांचा संदेश दिला आहे. पामबीच रोडवर किल्ले गावठाण शेजारी पालिका मुख्यालयासमोर ही कलाकृती आहे. गुरुवारी (ता. ५) या शिल्पाकृतीचे उद्‌घाटन करण्यात आले. 

नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सध्या फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉलचे सामने सुरू असल्यामुळे संपूर्ण शहर फिफामय झाले आहे. शहरात फुटबॉलचे वातावरण तयार व्हावे, यासाठी महापालिकेने सुशोभीकरण करताना फिफाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणातही फुटबॉलची प्रतिकृती कोरली आहे. शहरात ठिकठिकाणी केलेल्या सुशोभीकरणाच्या कामात फिफाची झलक दिसते. याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा संदेश देण्यासाठी अभिनव कलाकृती उभारली आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या व त्यांची झाकणे वापरून ही कलाकृती तयार केली आहे. ग्रीन सोसायटी फोरम स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कलाकृती उभारण्यात आली आहे. ‘रिसायकलेडेलिक फिफा म्युरल’ असे या कलाकृतीचे नाव आहे. 

फिफा व स्वच्छता असे दोन संदेश देण्याची सांगड यात घातली आहे. फोरमच्या प्रतिनिधींनी पाच दिवस शहरात फिरून फेकून दिलेल्या सात हजार बाटल्या व त्यांची झाकणे जमा करून ही कलाकृती बनवली. साडेसहा फूट व्यासाचे हे वर्तुळाकार शिल्प २५० किलो वजनाचे आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख यातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 

नवा सेल्फी पॉइंट
मानवी वर्तनातून पर्यावरणपूरक बदल घडावा, एका बाजूला प्लास्टिकचा कमीत कमी वापर तर दुसऱ्या बाजूला टाकाऊ प्लास्टिकचे कलात्मक वस्तूत रूपांतर करणे असे दोन संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला आहे. महापालिकेच्या मुख्यालयासमोरील ही कलाकृती सेल्फी पॉइंट ठरली आहे. फोरमचे बनॉय के, मच्छिंद्र पाटील, सजपालसिंग नोएल, ऑल्विन ऑगस्टीन यांच्या संकल्पनेतून किशोर विश्‍वास, सद्दाम हुसेन, निखिलकुमार, डॉन वारके यांच्या सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारली.