कॉंग्रेस-मनसे कार्यकर्त्यांत दादरमध्ये हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - दादर येथे कॉंग्रेसने काढलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मनसे आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते बुधवारी सकाळी समोरासमोर आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्याने मोर्चाचा फज्जा उडाला.

मुंबई - दादर येथे कॉंग्रेसने काढलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मनसे आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते बुधवारी सकाळी समोरासमोर आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्याने मोर्चाचा फज्जा उडाला.

फेरीवाल्यांचा विरोध करणारी मनसे आणि त्यांचे समर्थन करणारी कॉंग्रेस या दोघांतील तणावाचे पडसाद आज अन्यत्रही उमटले. कॉंग्रेसने दादर परिसरात बुधवारी मराठी फेरीवाल्यांसाठी "सन्मान मोर्चा' काढण्याचे ठरवले होते. मोर्चाच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक बटाटे आणि लिंबू फेकण्यास सुरवात केल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये पळ काढला. या घटनेमुळे दादर रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन व विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या सुमारे 12; तर मनसेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ) राजीव जैन यांनी दिली. दरम्यान, मुंबई कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या अंधेरी येथील घरासमोर दबा धरून बसलेल्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Web Title: mumbai news fighting in congress mns activists