कल्याण पूर्व मोबाईल टॉवर च्या केबिनला आग.... जीवितहानी नाही....

रविंद्र खरात 
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कल्याण पूर्व मधील म्हसोबा चौकातील भाग्यश्री अपार्टमेंटच्या टेरेसवरील मोबाइल टॉवर आणि केबिनला आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाच्या कर्मचारी वर्गाने त्या सोसायटी मधील मीटर काढून घेतले तर त्या परिसर मधील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला

कल्याण  - कल्याण पूर्वेतील भाग्यश्री अपार्टमेंटच्या टेरेसवरील मोबाइल टॉवर आणि केबिनला आज गुरुवार ता 5 ऑक्टोबर सकाळी अकराच्या सुमारास आग लागली , घटनेची माहिती मिळताच पालिका अग्निश्यामन दलाच्या पथकाने धाव घेत आग विझवली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र पालिका हद्दीत अनेक इमारतीवर लावलेले मोबाईल टॉवर आणि केबिन मधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . 

कल्याण पूर्व मधील म्हसोबा चौकातील भाग्यश्री अपार्टमेंटच्या टेरेसवरील मोबाइल टॉवर आणि केबिनला आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाच्या कर्मचारी वर्गाने त्या सोसायटी मधील मीटर काढून घेतले तर त्या परिसर मधील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. पालिकेच्या अग्निश्यामन दलाच्या जीवन बोराडे , रमेश खोपडे सुनिल मोरे , जाँन मुर  ,बंदु सहारे, जगदीश पुरळकर ,रतिलाल कोळी आदींच्या पथकाने आग विझविण्याचे काम केले , तब्बल एक तासाने पथकाला आग विझविण्यात यश आले . या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही . 

टॉवर आणि उपाय योजना ....

आजच्या आग प्रकरण मुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील मोबाईल टॉवर आणि केबिन मधील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे , यामुळे पालिका काय कारवाई करते याकडे लक्ष्य लागले आहे .