बुचर बेट पेटलेलाच! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबईतील बुचर बेटावरील डिझेल टाकीला शुक्रवारी सायंकाळी लागलेली आग रविवारी मध्यरात्रीपर्यंत विझली नव्हती. या बेटावर आठ इंधन टाक्‍या आहेत. आग पसरू नये याकरिता इतर टाक्‍यांच्या बाजूने पाण्याचा पडदा निर्माण केला जात आहे. सोमवार दुपारपर्यंत आग आटोक्‍यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान 60 तासांपासून आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. आग नियंत्रणात आल्याचे मुंबई अग्शिमन दलाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विजेचा लोळ कोसळून बुचर बेटावरील डिझेल टाकीला आग लागली. या 13 क्रमांकाच्या टाकीत सुमारे तीन कोटी लिटर डिझेल असून, त्यातील काही डिझेल टाकीच्या खालील भागातून बाहेर काढण्यास शनिवारपासून सुरवात करण्यात आली. आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने इतर टाक्‍यांमधील इंधन पेट घेण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे काही टाक्‍या रिकाम्या करण्यात आल्या आहेत; तर काही टाक्‍यांच्या परिसरात पाण्याचा पडदा निर्माण केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: mumbai news fire Butcher Island