जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

विलेपार्ले येथे कैफी आझमी पार्कच्या परिसरात प्राथना ही 13 मजली इमारतीचे काम सुरु होते. रात्री 10 च्या सुमारास तळ मजल्यावर आग लागली. तेथे मोठया प्रामाणात लाकडे आणि इतर साहित्य ठेवले होते. रात्री 10 च्या सुमारास तेथे आग लागली, आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. अग्निशमन दलाने प्रथम पाच जणांना बाहेर काढले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.

मुंबई : विले पार्ले पश्चिमच्या प्रार्थना या 13 मंजली बांधकामधीन इमारतीला बुधवारी रात्री लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी आहेत.

इमारतीच्या तळ मजल्यावर लााकडे ठेवण्यात आली होती. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

विलेपार्ले येथे कैफी आझमी पार्कच्या परिसरात प्राथना ही 13 मजली इमारतीचे काम सुरु होते. रात्री 10 च्या सुमारास तळ मजल्यावर आग लागली. तेथे मोठया प्रामाणात लाकडे आणि इतर साहित्य ठेवले होते. रात्री 10 च्या सुमारास तेथे आग लागली, आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या. अग्निशमन दलाने प्रथम पाच जणांना बाहेर काढले. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर घटनास्थळाहून आठ जखमींना बाहर काढण्यात आले. त्यांच्यावर पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. 

Web Title: Mumbai news fire in Juhu 5 dead

टॅग्स