जेजे रुग्णालयात प्रथमच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

श्रीमती संगीता महाजन यांनी केले लिव्हर व डोळ्यांचे दान

मुंबई : श्रीमती संगीता राजेश महाजन (रा. जळगाव) यांना १७ जुलै रोजी जळगाव येथे बाजारात गेल्या असतांना मोटारसायकल ने धडक दिली. त्यानंतर त्या जळगाव येथे तीन दिवस उपचार घेत होत्या. बेशुद्ध झाल्याने त्यांना २० जुलैला रात्री सर जेजे रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर संगीता यांचा ब्रेन मृत पावत असल्याचे जेजे रूग्णालयातील डाॅक्टरांच्या लक्षात आले. त्यांना डाॅक्टरांनी नातेवाईकांना अवयव दानासाठी विचारपूस केली. पण नातेवाईकांना तयार करण्याचे अवघड काम आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी केले. संतोष आंधळे यांनी सर्व संपर्क व्यवस्था पाहिली. सर्व तपासन्या झाल्यानंतर लिव्हर व डोळे दान करण्यात सर जेजे रूग्णालयातील टीमला यश आले.

सर जेजे रुग्णालयात ब्रेन डेड घोषित होत असत, पण नातेवाईक तयार होत नसल्याने अवयव दान करता येत नव्हते. संगीता यांचे लिव्हर ज्युपिटर रुग्णालयास व डोळे सर जेजे रुग्णालयास देण्यात आली. राजेश महाजन यांच्या स्वःताच्या पण आई ते १० वर्षांचे असतानाच वारल्या होत्या. त्यांच्या मुलांनाही दहाव्या वर्षीच आईचे छत्र गमवावे लागले. हा एक वेगळाच योगायोग आहे. अधिष्ठाता डाॅ. तात्याराव लहाने, डाॅ. कमलेश, डाॅ. भोसले, डाॅ. सचिन, डाॅ. ऊषा, डॉ. प्रिया व डाॅ. संजय सुरासे यांनी व जेजे अवयवदान टीमने यासाठी खूप परिश्रम घेतले.

आपली पत्नी मृत्यूच्या दारात व आपली मुले अनाथ होणार हे माहीत असूनही राजेश महाजन यांनी अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेउन इतरांनाही चांगला मार्ग दाखवल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गिरीश महाजन यांच्या अवयवदान करण्याच्या आव्हानांमुळे प्रेरीत होऊन आपण हा निर्णय घेत असल्याचे राजेश महाजन यांनी सांगितले.

मुंबई

कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण...

07.42 PM

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला...

03.36 PM

ठाणे : ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच असुन मागील 24 तासात 151 मिमी पावसाची नोंद झाली. वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या...

12.51 PM