समुद्रात बोट बुडाली दोन मच्छीमार बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई - गिरगाव चौपाटीजवळील समुद्रात सोमवारी सकाळी बोट बुडून दोन मच्छीमार बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी तटरक्षक दलातर्फे मोहीम राबवण्यात आली; मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर सायंकाळी मोहीम बंद करण्यात आली.

राजभवनजवळील समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. त्याच्या काही अंतरावर ही बोट आढळली. दोन मच्छीमारांनी पाण्यात उडी मारून पोहोत काठावर जाण्याचा प्रयत्न करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या मच्छीमारांच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली. तटरक्षक दलाच्या जवानांनी सर्व परिसर पिंजून काढला.

मच्छीमारांचा शोध न लागल्याने ते बुडाले असावेत किंवा पोहत किनाऱ्यावर आले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.