तापाच्या रुग्णांमध्ये मुंबईत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - काही दिवसांपासून मुंबईत तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यात जंतूसंसर्गाच्या तापाच्या (व्हायरल फिव्हर) रुग्णांची संख्या अधिक आहे. या तापाच्या लक्षणांतही बदल होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. व्हायरल ताप आलेल्या काही रुग्णांच्या अंगावर चट्टे, तर काहींच्या अंगावर लाल रंगाचे पुरळ उठते. या रुग्णांना आठवडाभर, तर काहींना 10-15 दिवस ताप असतो. अनेक रुग्णांमध्ये डेंगी किंवा मलेरियाच्या तापासारखी लक्षणे दिसतात, असे डॉ. आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले. पालिका रुग्णालयांत सध्या तापाचे रुग्ण फार येत नाहीत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या रुग्णांची संख्या वाढू शकते, असे परळ येथील पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
टॅग्स