देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन रविवारी (ता. 17) महाराष्ट्रात होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनमध्ये हे संमेलन होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शायना एन. सी., सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

""राज्य सरकारची वृक्षलागवड मोहीम, नदीस्वच्छता व पुनरुज्जीवन कार्यक्रमाबाबत या संमेलनाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. ईशा फाउंडेशनतर्फे "रॅली फॉर रिव्हर' उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने राज्यात लोकचळवळ निर्माण केली जाणार आहे,'' असे मुनगंटीवार यांनी सांगितले.