'गणेशोत्सवात पोलिसांना गणेश मंडळांनी सहकार्य करावे'

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई सारख्या महानगरात पोलिसांची संख्या अत्यंत कमी असूनही पोलिस दिनरात जागल्याची भूमिका घेत जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. गणेशोत्सव आणि बकरी ईद हे सण येत असल्याने "हिन्दू मुस्लिम सलोख्याचे "एकतेचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.

मुंबादेवी : ना. म. जोशी मार्ग शाळेत पोलिस आणि गणेश मंडळ समन्वय समिती यांनी आयोजित समारंभात उत्कृष्ट गणेश मंडळांना परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्या वेळी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी आणि पोलिसांना मार्गदर्शन करतांना "सामान्य माणूस ही पोलिस असून त्याने आपापल्या  विभागातील गणेश मंडला जवळ खबरदारी घेत जागरूक राहावे.कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून सावधान राहावे.अलीकडेच परदेशात झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण सागळयाणी सावध राहून काम केले पाहिजे.