मुंबई: गिरगांव चौपाटीवर दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन

ganpati
ganpati

मुंबादेवी : दक्षिण मुंबईचा समुद्र किनारा आणि गणेश भक्तांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या गिरगाव चौपाटीवर दुपारी 11 वाजल्या पासून सुरु झालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणूका रात्री 12 वाजे पर्यंत सुरूच होत्या.

दीड दिवसांच्या घरगुती हौसेच्या आणि नवसांच्या गणपती बाप्पां बरोबरच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालित विसर्जन करण्यात आले.ढोल- ताशा पथके ,बैंजो आणि सनई बाजा यांच्या ठेक्यावर तरुणाई ची थिरकणारा जल्लोष आनंदाला उधान आनित होते.त्यातही घरगुती गणेशांना विसर्जना वेळी लहान मुला मुलींचा बाप्पाला निरोप देताना बाय बाय बाप्पा. सी यु नेक्स्ट ईयर असे हात हलवुन म्हणताना आणि समुद्रात पाठमोरे ओझरते दर्शन पाहताना चेहऱ्यावरील केविलवाना दुःखद भाव सहज ठीक ठिकाणी नजरेत भरत होता. चौपाटीवर नजर फिरेल तेथे गणेश भक्तांची गर्दीच गर्दी दिसत होती. बाहुबली आणि खंडोबांच्या मुर्त्यांची भुरळ आजही लोकांच्या मनावर असल्याने त्यांच्या रूपातील गणेश मुर्त्या डोळ्यांना भावत होत्या.बापांच्या विविध मुर्त्या आणि त्यांचा सजविलेला विलोभनिय साज आणि त्यातच  होणाऱ्या विसर्जन  पूर्व आरत्यांच्या आवाजाने चौपाटीवर सर्वत्र मंगलमय वातावरण होते.

पोलिसांचा अत्यंत चोख आणि कड़क बंदोबस्त होता.पोलिस खात्यातील अत्यंत प्रामाणिक आणि कड़क शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे दक्षिण प्रादेशिक विभागाचे  अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ हे स्वतः चौपाटी परिसरात पायी फिरत बन्दोबस्ताची माहिती घेत होते. उपायुक्त,सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची टीम तसेच राज्य राखीव पोलिस बळ प्लाटून बंदोबस्तावर होती.आम्ही कड़क बंदोबस्त ठेवलेला असून येथे कोणतीही अप्रिय घटना,अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पथके तैनात असून पोलिस सर्वच बाबतीत खबरदारी घेत आहेत.लोकांनी-गणेश भक्तांनी सहकार्य करावे.बंदोबस्त चोख आहे ; लोकांनी सावधानता बाळगावी असे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सकाळशी बोलताना सांगितले.ट्राफिक च्या पोलिसांची टीम वाहतूक नियंत्रण आणि मार्गदर्शन करीत होती.महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांची उपस्थिति लक्षणीय होती.

समुद्रावर लाईफ गार्ड आणि प्रथमोपचार तंबू उभारण्यात आलेले होते.अत्यावश्यक रुग्ण सेवेकरिता डॉक्टरांचे पथक आणि रुग्ण वहिकांची तात्काळ व्यवस्था करण्यात आलेली होती. लहान आणि मोठ्या गणेश मूर्त्याना समुद्रात खोलवर पाण्यात सोडण्यासाठी ख़ास फ्लोटरची व्यवस्था आणि त्यावर मनपा कर्मचारी आणि लाईफ गार्ड होते.

मुंबई महानगर पालीके च्या विविध विभागां तर्फे निर्माल्य कलश आणि स्वच्छता अधिकारी यांचे पथक कार्यरत होते.मुख्य नियंत्रण  कक्ष आणि मार्गदर्शन मनोरे वरुन पोलिस खबरदारी आणि सुरक्षेच्या सुचना ध्वनिक्षेपका वरून वारंवार देत होते. 
मुख्य प्रवेश द्वारातून पोलिस टैक्सी,ट्रक आणि टेंपो तसेच  चार चाकी हात गाडी वरुन येणाऱ्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरावणुकांना आता चौपाटीकडे सोडत होते.
तरुणाईच काही औरच बाज होता. चोख पोलिस बंदोबस्त असल्या मुळे गिरगाव चौपाटीवर उशीर होत असला तरी आम्ही निर्धास्त आहोत असे स्नेहल अभिजीत कांबळे आणि श्रद्धा श्याम ठाकुर यांनी सांगत पोलिस कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानले.प्रत्यक्ष अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी रस्त्यावर उतरुन वाहतुकीचे नियंत्रण करताना पाहुन सामान्य पोलिस अंमलदार खुशीत होते कारण एका कणवाळू अति वरिष्ठ अधिकारी साहेबां सोबत लोकांना संरक्षण- मार्गदर्शन देत आहोत ही भावना पोलिसांच्या चांगल्या मनोवृत्तिचे उदाहरण देत होती. दादासाहेब भडकमकर मार्ग(डी बी मार्ग आणि गावदेवी पोलिसांसह अन्य पोलिस बंदोबस्त बाहेरील झोन मधून मागविण्यात आला होता.चोख पोलिस बन्दोबस्ता मुळे छेड़खानी सारख्या अप्रिय घटना टळल्या असे पोलिसांनी सांगितले.गावदेवी पोलिस ठाण्याचे वपोनि नेतानी भोपळे,राहुल धुमाळ उपनिरीक्षक शुभांगी मालुसरे, उत्तम पाचपुते याच्यासह पोलिस कर्मचारी विविध पॉइंटवर बंदोबस्तावर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com