कचऱ्याची विल्हेवाट परिसरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - झोपडपट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर भविष्यात घराजवळच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्याचबरोबर सध्या ५२ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत असून, भविष्यात १०० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे महापालिकेचे ध्येय आहे.

झोपडपट्ट्यांमधून माणसी २०० ते २५० ग्रॅम कचरा तयार होतो. काही ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प महापालिकेने सुरू केले आहेत; मात्र भविष्यात प्रत्येक झोपडीतील कचऱ्यावर त्याच परिसरात विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. झोपड्यांमधील कचरा गोळा करण्याचे महानगरपालिकेपुढे सर्वांत मोठे आव्हान आहे. डोंगराळ भागात असलेल्या झोपड्यांमधील कचरा योग्य प्रकारे गोळा होत नाही. त्यामुळे अनेक डोंगराळ परिसर हे अनधिकृत डंपिंग ग्राऊंड झाले आहेत. त्यामुळे झोपड्यांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकेल. क्षेपणभूमीसाठी जागा अपुरी असल्याने महापालिकेने कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर दिला आहे; मात्र आजही अवघ्या ५२ टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे.

पाच हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून खतनिर्मिती
मुंबईत निर्माण होणाऱ्या सात हजार ३०० मेट्रिक टनपैकी सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचरा हा हिरवा आणि ओला कचरा असतो. त्यातून खतनिर्मिती शक्‍य आहे, असे खतनिर्मितीचे लहान-लहान प्रकल्प उभारता येऊ शकतात. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यास क्षेपणभूमीवरील ताण कायमचा बंद होऊ शकतो.

Web Title: mumbai news garbage

टॅग्स