घाटकोपरमध्ये कचरामुक्त अभियान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

घाटकोपर - मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध आजार पसरण्याची शक्‍यता लक्षात घेत प्रभाग क्रमांक १२९ चे नगरसेवक व बाजार उद्यान समितीचे सदस्य सूर्यकांत गवळी यांनी पुढाकार घेत प्रभागात कचरामुक्त अभियान हाती घेतले आहे. या योजनेंर्तगत ‘स्वच्छ प्रभाग, निरोगी प्रभाग’ ही संकल्पना राबवण्यात आली. 

प्रभागातील नागरिक कचरा रस्त्यावरच टाकत असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. यासाठी सूर्यकांत गवळी यांनी ‘स्वच्छ प्रभाग, निरोगी प्रभाग’ ही योजना प्रभागात राबवली आहे. या योजनेंतर्गत प्रभागातील नागरिकांनी दत्तक वस्तीअंतर्गत कचरा जमा करायला येणाऱ्या कामगारांकडे कचरा द्यावा, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास साहजिकच प्रभाग स्वच्छ व निरोगी राहील, असे गवळी यांनी सांगितले. 

हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरसेवक गवळी यांनी एन वार्ड सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांची भेट घेतली. कचऱ्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या ठिकाणी कचरा गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, असे निवेदनही त्यांनी कापसे यांनी दिले. तसेच शनिवारी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसह विभागाची पाहणी करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात उपाययोजना केल्या. 

अतिवृष्टीमुळे आजाराची साथ पसरण्याची भीती लक्षात घेऊन गवळी यांनी प्रभागात घेतलेल्या आरोग्य शिबिरांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

Web Title: mumbai news Ghatkopar Garbage