राजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है; चिमुकलीने दिली घोषणा

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात आपले ज्वलंत विचार मांडताना कार्यकर्त्यांत स्फुरण निर्माण करतानाच अभिनेते नाना पाटेकरांना चोंबडेपणा करू नकोस असे सुनावत चांगलेच तोंडसुख घेतले.

मुंबई : 'राजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है.. अशी घोषणा एका छकुलीने दिली आणि सर्वाचे लक्ष तिच्याकडे आकर्षित झाले आणि खुद्द राजसाहेबांनी तीने दिलेली घोषणा एेकली आणि साहेबांनी तिला स्टेज वर बोलवुन घेतले. तिला प्रेमाने उचलून घेत शुभार्शिवाद दिले.

राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात आपले ज्वलंत विचार मांडताना कार्यकर्त्यांत स्फुरण निर्माण करतानाच अभिनेते नाना पाटेकरांना चोंबडेपणा करू नकोस असे सुनावत चांगलेच तोंडसुख घेतले.

विशेष म्हणजे छोटीशी मनसैनिक मुंबादेवी प्रभागात राहणारी असून मनसैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांची सुकन्या सिद्धी शिंदे होय. आज दिवसभर या छकुलीची राज यांच्यासह असलेली छबी सोशल मिडियावर व्हायरल झाली असून तिला पसंती मिळत आहे.