सहार विमानतळावर 67 लाखांचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर 67 लाखांचे सोने तस्करांकडून जप्त केले. दुबईहून आलेल्या मोहाना जेम्स या महिलेने अंतर्वस्त्रात सोने लपवून आणले होते. तिच्याकडे 27 लाख 38 हजारांच्या सोन्याच्या लडी सापडल्या.

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर 67 लाखांचे सोने तस्करांकडून जप्त केले. दुबईहून आलेल्या मोहाना जेम्स या महिलेने अंतर्वस्त्रात सोने लपवून आणले होते. तिच्याकडे 27 लाख 38 हजारांच्या सोन्याच्या लडी सापडल्या.

मोहाना तमिळनाडूतील एका शाळेत काम करते. या तस्करीच्या मोबदल्यात तिला 10 ते 15 हजार रुपये मिळणार होते. तिला अटक करून तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तिला चौकशीकरिता बोलावले जाणार आहे. सोन्याच्या तस्करीकरिता महिलांचा वापर वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. 30) "एआययू'चे उपायुक्त प्रज्ञाशील जुमळे यांच्या पथकाने विमानतळावर सापळा रचला होता. त्या वेळी दुबईहून सहार विमानतळावर उतरलेल्या मोहानाचा संशय अधिकाऱ्यांना आल्याने तिची अंगझडती घेऊन सोने जप्त करण्यात आले; तसेच दुबईहून सहार विमानतळावर उतरलेल्या तबस्सूम आरिफ शेख या महिलेकडून 12 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. कर्नाटकचा रहिवासी असलेला अब्दुल जैलानी हा प्रवासी रियाधहून सहार विमानतळावर उतरला. त्याच्याकडून 10 लाख 30 हजारांचे सोने जप्त करण्यात आले. त्याने हे सोने टोपीमधल्या चोरकप्प्यात लपवले होते. तो रियाधमध्ये कपड्याच्या दुकानात कामाला होता. केनियाची नागरिक असलेल्या फातिमा शेख हसन या महिलेकडे 18 लाखांचे सोने सापडले. जुलेखा उस्मान मन्सुरी या प्रवाशाकडून 11 लाख 44 हजार 800 रुपयांचे अमेरिकी चलन जप्त करण्यात आले. हे पैसे पुस्तकाच्या पानांत लपवलेले होते.

मुंबई

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM

नवी मुंबई - राज्यात या वेळी चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पदनात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न...

02.39 AM