पायाच्या कुंचल्याने रंगला कॅनव्हास

पायाच्या कुंचल्याने रंगला कॅनव्हास

गोरेगाव - गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये रविवारी आलेला जवळजवळ प्रत्येक ग्राहक वळून वळून एकाच ठिकाणी घुटमळत होता. कारण तिथे चितारली जात होती अप्रतिम चित्रे अन्‌ तीही चक्क पायाने. दोन दिव्यांग कलाकारांनी पायात पकडलेला कुंचला कॅनव्हासवर अनोखा आविष्कार साकारत होता; अन्‌ त्यांची अद्‌भुत कला पाहून गोरेगावकर हरखून जात होता.

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत ओबेरॉय मॉलने रविवारी दिव्यांग व्यक्तींसाठी काही कार्यक्रम आयोजित केले होते. दोन्ही हात नसलेल्या दोन दिव्यांग चित्रकारांनी रेखाटलेली सुरेख चित्रे पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. इंडियन असोसिएशन ऑफ माऊथ ॲण्ड फूट पेंटिंग आर्टिस्ट आणि ओबेरॉय मॉलच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग असूनही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या बंदेनवाझ नदाफ आणि नदीम रियासत यांनी त्यात आपली चित्रकला सादर केली. दिव्यांग असतानाही इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी चित्रकलेवर प्रभुत्व मिळविले आहे. दोन्ही कलाकारांनी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवीत पदकांची लयलूट केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com