सरकारचा निर्णय लाजिरवाणा - चिदंबरम

सरकारचा निर्णय लाजिरवाणा - चिदंबरम

मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शंभरावी जयंती साजरी न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लाजिरवाणा असल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केली.

येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना चिदंबरम यांनी वरील मत मांडले. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला निर्णय लाजिरवाणा आहे, असे चिदंबरम म्हणाले. या वेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. आपण गरिबांचे तारणहार आहोत असे दाखविण्याचा मोदी यांच्या प्रयत्न असला तरी त्यांच्या सरकारची आर्थिक धोरणे अपयशी ठरली आहेत, असे चिदंबरम म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com