न्यायालयाच्या निर्णयाचे गोविंदा करणार पालन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - दहीहंडीच्या उंचीसंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. उच्च न्यायालयात 7 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदरच करू. योग्य ती खबरदारी घेत आमचा सरावही चालूच ठेवू, अशी भूमिका सध्या गोविंदा पथकांनी घेतली आहे.

गोपाळकाला पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालय दहीहंडीच्या संदर्भात नेमका काय निकाल देणार याकडे सर्वच दहीहंडी पथकांचे लक्ष लागले होते. काही जण संभ्रमावस्थेत होते; मात्र न्यायालयाच्या निकालाचा आदरच करू, असे सांगत या पथकांनी सुरक्षेची योग्य ती काळजी घेऊन सराव चालूच ठेवण्याचे ठरवले आहे. राज्य सरकार योग्य ती भूमिका न्यायालयात मांडेल, असा विश्‍वासही या पथकांनी व्यक्त केला आहे.