हॉटेलचे जेवण झाले स्वस्त 

हॉटेलचे जेवण झाले स्वस्त 

तुर्भे - हॉटेलच्या जेवणावरील जीएसटी 18 ऐवजी पाच टक्के केल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यानुसार बुधवारपासून (ता. 15) नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनने शहरातील सर्व हॉटेलमालकांना केवळ पाच टक्के जीएसटी घेण्याची सूचना केली आहे. यामुळे याबाबतची अधिसूचना निघाली नसल्याने हॉटेलमालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. 

जीएसटी लागू झाल्यापासून ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरवली होती. यामुळे 40 टक्के व्यवसाय कमी झाल्याने हॉटेलमालक अडचणीत सापडले होते. नवी मुंबईत दीड हजार हॉटेल आहेत. यातील 600 हॉटेलमालक नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी बुधवारी सकाळपासूनच पाच टक्के सेवाकर लागू करण्यास सुरुवात केली आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी सांगितले. यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालेल, अशी आशा शेट्टी यांनी व्यक्त केली. 

जीएसटी लागू झाल्यामुळे हॉटेलचे जेवण नको म्हणायची वेळ आली होती. 18 टक्के जीएसटीमुळे फॅमिलीसोबत डिनरला जाताना आधी विचार करावा लागत होता; मात्र आता तो पाच टक्‍क्‍यांवर आल्याने पार्टी व फॅमिली डिनरसाठी हॉटेलमध्ये जाताना आता जीएसटीच्या भूताची भीती वाटणार नाही. 
- जयश्री खांडेकर, रहिवासी, बेलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com