...तर मेट्रोचे काम थांबवू - हाय कोर्ट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कुलाबा-सीप्झ मेट्रो रेल्वे 3 चे काम रात्री सुरू ठेवल्यास मेट्रोच्या कामालाच मनाई करू, असा सज्जड इशारा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाला दिला. 

रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मेट्रोचे काम करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. स्थानिक नागरिक रॉबीन जयसिंघानी यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने मनाई आदेश दिला आहे. मात्र असे असतानाही मेट्रोचे काम रात्री सुरू असते, अशी तक्रार आज याचिकादाराच्या वतीने करण्यात आली. याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही मेट्रोचे काम रात्री करण्यात येत असेल, तर मेट्रोच्या कामालाच मनाई करावी लागेल, अशी तोंडी ताकीद खंडपीठाने प्राधिकरणाला दिली. 

Web Title: mumbai news high court metro