महापालिका रुग्णालयात बाळंतिणीवर अत्याचाराचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

कळवा - रुग्णालयात बाळांतिणीवर चेहऱ्यावर मास्क लावलेल्या एकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करवून पळ काढला. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी पहाटे हा प्रकार घडला. 

पीडित महिला दिवा येथील रहिवासी आहे. प्रसूतीसाठी ती तीन दिवसांपूर्वी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाली. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने तिच्या मुलाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. रविवारी पहाटे त्याला दूध पाजून महिला वार्डमधून बाहेर येताना चेहऱ्यावर मास्क लावलेल्या एकाने पीडित महिलेला ओढत अंधाऱ्या खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने कशीबशी आपली सुटका करून वार्डमध्ये झोपलेल्या आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आणि रुग्णालयात खळबळ उडाली. आरोपीने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यामुळे तो डॉक्‍टर होता की अन्य कोणी, हे स्पष्ट झाले नाही. एक दिवस उलटूनही आरोपी सापडला नसल्याने रुग्णालयात दाखल महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

रुग्णालयात बाळंतिणीवर अत्याचाराचा प्रयत्न हा निंदनीय प्रकार आहे. या प्रकरणील दोषी कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आरोप सिद्ध झाल्यास संबंधिताला त्वरित निलंबित करू. 
- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी रुग्णालय 

Web Title: mumbai news hospital