आयआयटीची ३४ व्या स्थानावर झेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने ३४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी मुंबई आयआयटी ३५ व्या स्थानावर होती.

मुंबई - आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने ३४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी मुंबई आयआयटी ३५ व्या स्थानावर होती.

क्वाक्वरेली सिमोण्ड्‌स (क्‍यूएस) या ब्रिटिश कंपनीकडून आशियातील विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये आयआयटीच्या कामातील प्रगतीवरून २०१७ मध्ये संस्थेला ३४ वे स्थान देण्यात आले. क्‍यूएसने सोमवारी ही क्रमवारी जाहीर केली. क्‍यूएसने दिलेल्या गुणांमध्ये आयआयटीला १०० पैकी ७५ गुण मिळाले. शैक्षणिक, रोजगार, पीएच.डी. कर्मचारी आदी निकषांमध्ये आयआयटीला चांगले गुण मिळाले. मानांकनात वाढ झाल्याने आयआयटीचे संचालक प्रा. देवांग खाकर यांनी आभार व्यक्त केले. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमुळेच मानांकन वाढल्याचे डॉ. खाकर यांनी सांगितले.

यंदा जूनमध्ये क्‍यूएस जागतिक विद्यापीठाचे मानांकन जाहीर केले होते. यामध्ये आयआयटीला वाढ मिळाली होती. आयआयटीचे जागतिक विद्यापीठाच्या मानांकनामध्ये ४० व्या स्थानाने वाढ होत ते १७९ वर आले होते.