मंत्रालयातील चौरस आहारगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई: मंत्रालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या चौरस आहारगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (सोमवार) करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ऐतिहासिक असे हे चौरस आहारगृह 1945 पासून सुरु करण्यात आले आहे. काळानुसार ते बदलत गेले. नुतनीकरण करण्यात आलेले  आहारगृह अतिशय सुंदर व सर्व सोयीनीयुक्त आहे. याठिकाणी 1500 ते 1600 लोकांची जेवणाची सोय होते. या आहारगृहात आपण आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

हे चौरस आहारगृह 8 ऑगस्ट 1945 पासून नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखाली सुरु करण्यात आले होते. 1967 मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्थायी कल्याणकारी योजना म्हणून चौरस आहारगृह ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. या आहार गृहात 20 ते 25 मिनीटात 200 व्यक्तींना जेवण पुरविण्याची व्यवस्था असल्याचे प्रास्ताविक करताना सहसचिव (उपाहारगृहे) इम्तियाज काझी यांनी सांगितले.

याप्रसंगी महाव्यवस्थापक (उपाहारगृहे) दादासाहेब खताळ, प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे, वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र जाधव तसेच मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: