माहिती अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - माहिती देण्यास नकार दिल्या प्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी मुलुंडच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. माहिती आयुक्तांनी दोन वेळा माहिती देण्याचे आदेश दिले होते; परंतु या जनमाहिती अधिकाऱ्याने त्यांना केराची टोपली दाखवली.

कुर्ला पश्‍चिम येथील डायमंड महाराष्ट्र एसआरए को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांच्या फसवणुकीबाबत हरिबा चोपडे यांनी मुलुंडच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अतिक्रमण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज केला होता; परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती नाकारली. त्याविरुद्ध चोपडे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केले होते. त्याबाबत सुनावणी घेऊन राज्य माहिती आयुक्तांनी (बृहन्मुंबई) माहिती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यास 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी (पूर्व उपनगरे) यांना दिले.