'तेजस'विषयी सूचना पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - 'तेजस एक्‍स्प्रेस'मधून गोव्यातील करमाळीपासून मुंबई सीएसटीपर्यंत प्रवास करताना प्रवाशांना अनेक गैरसोयी सहन कराव्या लागल्या. या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वेने आपल्या वेबसाईट आणि ऍपवर सूचना पाठविण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. "तेजस'मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, 3 जूनपर्यंत प्रतीक्षा यादी असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 22 मे रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. करमाळीपर्यंत ही ट्रेन व्यवस्थित धावल्यानंतर परतीच्या प्रवासात मात्र प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. डब्यांची स्वच्छता केलेली नव्हती. आसनांमागील एलईडी हेडफोनही चोरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली. कोकण रेल्वेने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वेबसाईटवर सूचना व प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन केले आहे.