मुलांकडे वाईट नजरेने पाहणेही ठरते गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुलांकडे वाईट नजरेने पाहणेही बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा आहे. एखादी व्यक्ती त्याच्या लैंगिक भावना चाळवल्याने मुलांकडे वाईट नजरेने पाहत असल्यास हा प्रकार पॉक्‍सो कायद्यातील कलम 11 मध्ये मोडत असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

पीडित मुलाच्या आईने आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी; तर आरोपीने त्याच्यावर दाखल केलेले पॉक्‍सो कायद्यातील कलम रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवरील एकत्रित सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. एम. बदर यांच्या खंडपीठासमोर झाली. आरोपी वालजी वाधेर हा पीडित मुलाकडे वारंवार वाईट नजरेने पाहत असल्याचे निदर्शनाला आल्यामुळे त्याला 5 फेब्रुवारी 2016 रोजी हटकले होते. त्यानंतरही त्याची नजर बदलली नसल्याचे मुलाच्या आईचे म्हणणे आहे. त्यावर एखादी व्यक्ती लैंगिक नजरेने कुठल्याही मुलाचा पाठलाग करत असेल, त्याच्याकडे वारंवार पाहत असेल किंवा त्याला भेटण्याचा प्रयत्न करत असेल, तर पॉक्‍सो कायद्यातील कलम 11 नुसार तो गुन्हा आहे. यासाठी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर ही बाब स्पष्ट होऊ शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.