जलयुक्त शिवारला 'खो' 

जलयुक्त शिवारला 'खो' 

जुन्या दरसूचीमुळे सुमारे 20 हजार कामे ठप्प 
मुंबई - राज्यात झालेल्या जलयुक्‍त शिवारच्या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, सर्वत्र त्याचे कौतुकही होत आहे. मात्र, जलसंधारण विभागाने सन 2015-16 आणि 2016-17 मध्ये प्रस्तावित जलयुक्‍त शिवारच्या कामांसाठी सन 2013-14 या वर्षाची दरसूची लागू करण्याचे आदेश काढल्याने राज्यभरातील तब्बल 19 हजार 927 कामे ठप्प झाल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

गेल्या वर्षी आणि यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडल्याने बळिराजा आनंदात आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने 2015 पासून मोठ्या प्रमाणात जलयुक्‍त शिवारची कामे हाती घेतली. यामध्ये साखळी सिमेंट नाला बंधारे, कोल्हापूर बंधारे, ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण आदी कामांचा समावेश असून, ही कामे करण्यासाठी हजारो गावांची निवड करण्यात आली होती. परिणामी, एका वर्षात झालेल्या कामांमुळे गेल्या वर्षी पडलेल्या पावसात गावागावात जलसाठ्यांत वाढ झाली आणि जमिनीतील पाणीपातळीही वाढल्याचे दिसून आले. राज्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे भरभरून कौतुक करून यात आणखी लोकसहभाग वाढवावा, अशी सूचना जलबिरादरीचे संस्थापक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी नुकतीच राज्य सरकारला केली. या अनुषंगाने राज्यभरात सध्या 5 हजार 291 गावांत 1 लाख 65 हजार 769 कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी काही कामांना सुरवात झाली असून, अनेक ठिकाणची कामे पूर्णत्वाच्या तयारीत आहेत. 

दरम्यान, जलसंधारण विभागाने नुकतेच नवीन आदेश काढले आहेत. यामध्ये संबंधित कामांसाठी सन 2016-17 नव्हे तर 2013-14 ची दरसूची लागू करून कंत्राटदारांना निधी देण्याचे नमूद केले आहे. तीन वर्षांपूर्वीची महागाई, रेती, सिमेंट व अन्य बांधकाम साहित्याचे वाढलेले दर, डिझेलचे गगनाला भिडलेले दर, मजुरीत केलेली दरवाढ आदी खर्च वाढला असताना तीन वर्षांपूर्वीच्या दरात कशी कामे करणार, असा सवाल शेकडो कंत्राटदारांनी राज्य सरकारला केला आहे. परिणामी, राज्यभरातील तब्बल 25 हजार 217 कामे ठप्प झाल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

जलयुक्‍तच्या कामांची सद्यःस्थिती 
विभाग कामे सुरू केलेल्या गावांची संख्या पूर्ण झालेली कामे रखडलेली कामे एकूण कामे 
कोकण 135 3531 352 3883 
पुणे 825 43,749 3758 47,507 
नाशिक 900 20,814 4698 25,512 
औरंगाबाद 1518 39,062 9044 48,106 
अमरावती 997 19,089 1092 20,181 
नागपूर 915 19,597 983 20,580 
एकूण 5290 1,45,842 19,927 1,65,769 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com