अपघातात रेल्वे लाइनलगतच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी

मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मागील महिन्यात आसनगाव ते वासिंद रेल्वे स्थानक दरम्यान मेलगाड़ी अपघातामध्ये रेल्वे लाइन लगत असलेल्या अनेक शेतकरी वर्गाचे नुकसान झाले. त्याची भरपाई दया : रेल्वेकडे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाची मागणी ...

कल्याण : मध्य रेल्वे च्या आसनगाव वासिंद रेल्वे स्थानक दरम्यान मागील महिन्यात झालेल्या  नागपुर मुंबई दुरंतो एक्सप्रेस अपघात मध्ये रेल्वे मार्गाच्या आजुबाजुच्या अनेक शेतकरी वर्गाचे नुकसान झाले त्यांना रेल्वे मार्फत भरपाई द्यावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांच्याकडे केली आहे.

मध्य रेल्वेच्या आसनगाव वासिंद रेल्वे स्थानक दरम्यान 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास   नागपुर मुंबई दुरंतो एक्सप्रेस मेल गाड़ीचे 9 डबे रुळावरुन घसल्याने टिटवाळा ते कसारा 72 तासाहुन अधिक काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, जेव्हा अपघात झाला तेव्हा मेलगाडीचे डबे रेल्वे मार्गाच्या आजुबाजुच्या शेतात गेल्याने अनेक शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे, हा अपघात झाल्यावर मुंबई मध्ये मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांची भेट कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव, सचिव श्याम उबाळे यांच्या समवेत अन्य पदाधिकारी वर्गाने शनिवार ता 9 सप्टेबर रोजी भेट घेतली. यावेळी प्रवासी संघटनाकडून विविध समस्या मांडण्यात आल्या.

कसारामधून सकाळी 4 वाजून 23 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघते ती मुंबई मध्ये सकाळी सातच्या नंतर पोहचत असल्याने मुंबई मनपा, जे.जे, कस्तुरबा, केईम, लोकमान्य टिळक सायन या शासकीय रुग्णालयात तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा फर्स्ट शिफ्टला लेट मार्क लागत असून, ही लोकल पावने सातपर्यंत पोचावी यासाठी प्रवासी संघटनाने आग्रही मागणी केली. यामुळे तेथील दूधवाले, भाजीपाला विक्रेता यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, यासाठी 1 ऑक्टोबर पासून रेल्वे लोकल गाड्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर करेल. त्यात कसारा, आसनगाव, टिटवाळा, बदलापुर, अंबरनाथ या भागातील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी करत असताना 29 ऑक्टोबर रोजी आसनगाव ते वासिंद रेल्वे स्थानका दरम्यान जो अपघात झाला तेव्हा रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याबाबत सर्व्हे करून त्यांना रेल्वेमार्फ़त नुकसान भरपाई द्यावी.

त्यासोबत मध्य रेल्वेच्या प्रत्येक रेल्वे स्थानकात लोकल आणि मेल गाड्यांविषयी माहिती देणे नियमितपणे  बंधनकारक करावे  जर गाडीला उशिर होत असेल तर फलाटांवर त्यासंदर्भात प्रवाशांना उद्घोषणा करून आगाऊ माहिती दिल्यास प्रवासी वर्गाचे हाल होणार नाही आणि प्रवासी वर्ग उद्रेकही करणार नाही. तर कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक बाहेर पर्किंग विषय बिकट होत असून त्यावर तोड़गा काढावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासमस्यावर रेल्वे प्रशासन क़ाय तोड़गा काढ़ते याकडे लक्ष्य लागले आहे.

रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाने भेट घेवून समस्या मांडल्या, आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानक मध्ये मेल गाड़ीच्या अपघात बाबत लिखित पत्र आल्यास पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, त्या परिसर मध्ये मेल आणि मेलगाडीचे बिझी शेड्यूल आहे त्यात लोकल फेऱ्या वाढविणे अशक्य आहे त्यामुळे प्रथम माल गाड़ी आणि मेल गाड्यांचे शेड्यूल बसविले जात असून यातून लोकल फेरया वाढविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण