कल्याण डोंबिवलीमधील 531 धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

रविंद्र खरात 
मंगळवार, 4 जुलै 2017

पालिका हद्दीत धोकादायक 329, तर अतिधोकादयक 202 इमारती अश्या एकूण 531 इमारतीचा समावेश आहे. 

कल्याण : डोंबिवली पश्चिम येथील जूना आयरे रोड , मल्‍हार बंगल्‍या समोरील पंडित गंगाराम केणे यांच्‍या मालकिची असलेल्‍या तळ +4 मजली गंगाराम सदन या इमारतीला लागून असलेली लोड बेअरिंगची 4 मजली इमारत आज मंगळवार ता 4 जुलै रोजी कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील 531 धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

डोंबिवली मधील 40 वर्षीय जुन्या इमारत आज  मंगळवार ता 4 जुलै रोजी दुपारी इमारत कोसळयाने पालिका हद्दीमधील 531 धोकादायक इमारत प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत 2017 - 18 च्या सर्वे नुसार धोकादायक 329 आणि अतिधोकादायक 202 अश्या एकूण 531 धोकादायक इमारत असून सर्वात जास्त कल्याण पश्चिम मधील क वार्ड मध्ये 204 धोकादायक इमारत असून सर्वात कमी 2 इमारती  ई वार्ड मध्ये आहेत .

पालिका हद्दीत 10 प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि 122 वॉर्ड आहेत, अ प्रभाग मध्ये अति धोकादायक 3 इमारती , धोकादायक 8 इमारती ब प्रभाग मध्ये अति धोकादायक 12  धोकादायक 5 इमारती , क प्रभाग मध्ये अति धोकादायक 124 तर धोकादायक 80 ड प्रभाग मध्ये अतिधोकादायक 3 तर धोकादायक 3 जे वार्ड मध्ये अति धोकादायक इमारत 1 तर धोकादायक 20  , फ़ प्रभाग अति धोकादायक 17 धोकादायक 118 तर ह प्रभाग मध्ये अतिधोकादायक 17 धोकादायक 42 ग प्रभाग मध्ये अति धोकादायक 24  तर धोकादायक 52 आय प्रभाग  मध्ये शून्य धोकादायक इमारत ई प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतगर्त 1 अति धोकादायक तर 1 धोकादायक इमारती आहेत . 

याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महानगरपालिकेने धोकादायक व अतिधोकादायक असलेल्‍या 531 इमारतींची यादी जाहिर केली आहे. नागरीकांना धोकादायक व अतिधोकादायक इमारती कोसळून जिवित व‍ वित्‍तहानी होण्‍याच्‍या संभव आहे. त्‍यामुळे अशा इमारतीचा निवासी व वाणिज्‍य वापर बंद करावा. अशा प्रकारची इमारत कोसळल्‍यास होणा-या नुकसानीस रहिवासी जबाबदार राहतील.त्यामुळे नागरीकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करत ते पुढे म्हणाले की  ज्‍या धोकादायक इमारती दुरुस्‍ती योग्‍य अस‍तील व ज्‍या धोकादायक इमारतीचे पुर्नविकास प्रस्‍ताव योग्‍य त्या कागदपत्रसह दाखल होतील,त्‍यांना अती शिघ्रतेने मंजूरी देण्‍याची तजविज महानगरपालिकेने ठेवली असल्‍याने असे प्रस्‍ताव तातडीने सादर करणेच्‍या सुचना अतिरिक्‍त आयुक्‍त संजय घरत यांनी दिल्‍या आहेत. मात्र वारंवार पालिका घोषणा करून ही नागरिकाकडून प्रतिसाद मिळत नसून धोकादायक इमारत कोसळत असल्याचे प्रकार सुरु असल्याने पुन्हा धोकादायक इमारत प्रश्न ऐरणीवर आला आहे .