परिवहन सदस्यांनी केडीएमटी प्रशासनाची केली पोलखोल

परिवहन सदस्यांनी केडीएमटी प्रशासनाची केली पोलखोल

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाचे उपन्न वाढीसाठी सर्व जण प्रयन्त करत असताना डबघाईला का जात आहे याचा छडा लावण्यासाठी परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण , राजेंद्र दीक्षित , आणि संजय राणे यांनी शुक्रवार ता 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास केडीएमटी गणेश घाट डेपो ला अचानक भेट देत प्रशासनाची पोल खोल केली असून केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांची पुन्हा शासन दरबारी पाठवा अशी मागणी परिवहन सदस्यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्याकडे केली आहे.  

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून त्यात सुधारणा व्हावी यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात शिस्त लागणे गरजेचे आहे मात्र केडीएमटी गणेश घाटडेपो म्हणजे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती झाली आहे. शुक्रवार ता 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता गणेशघाट डेपो मध्ये परिवहन सदस्य संतोष चव्हाण , राजेंद्र दीक्षित , संजय राणे आदींनी अचानक भेट दिल्याने तेथील कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. सुरवातीला गणेश घाट डेपो च्या प्रवेश द्वारा जवळ सदस्य थांबले मात्र तेथील सुरक्षा रक्षक गायब होता , तो आला तर काही क्षणात आला तर त्याने कारण सांगितले की औषध आणण्यासाठी गेलो होतो , तद्नंतर डेपो मधील सर्व विभाग मधील कर्मचारी हजेरी बुक मागितले तर अनेक कर्मचारी वर्गाची हजेरी लावली असताना प्रत्यक्ष डेपो मध्ये बोटावर मोजणारे कर्मचारी होते.  

डेपो मधून बस बाहेर पडताना कर्मचारी वर्गाची तपासणी होणे गरजेचे आहे , त्यांच्या कडे पर्सनल कॅश किती आहे , तिकीट , ते दारू अथवा व्यसन केले आहे का ? बस मधील अवस्था ठीक आहे का ? मात्र असे न करता बसेस खुशाल सोडत असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले तर अकाउंट विभाग मधील कर्मचारी कुठे गेला तर तो चिल्लर बदली करण्यासाठी गेला मात्र त्याची साधी नोंद केली जात नसल्याचे समोर आले. 

कार्यशाळामध्ये संगणक विभागात बसेस च्या प्रत्येक साहित्याची नोंद करावी अश्या सूचना सदस्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या मात्र मागील दोन वर्षापासून तेथील संगणकच खराब असल्याने मग माहिती कुठे नोंद होते असा प्रश्न सदस्यांना पडला आहे.

केडीएमटी डेपो हा महत्वपूर्ण विषय असून तेथे कुणालाच शिस्त नसून अश्या भोंगळ कारभारमुळे परिवहनची उन्नती कशी वाढेल असा सवाल परिवहन सदस्यांनी केला आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवण्यात केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे  अपयशी ठरले असून त्यांची पुन्हा शासन दरबारी बदली करून शासनाचा अधिकारी न घेता पालिका मधील स्थानिक अधिकारी वर्गाला तो पदभार द्यावा अशी मागणी परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांच्याकडे केली आहे. या पोलखोल नंतर पालिका आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष्य लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com