'MIDC'च्या पाईपलाईनमधून खुलेआम पाणीचोरी !

'MIDC'च्या पाईपलाईनमधून खुलेआम पाणीचोरी !

कल्याण : एकीकडे कल्याण डोंबिवली मधील ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अवाढव्य जलवाहिन्यातून सर्रासपणे पाणीचोरी होत आहे. कल्याण शिळफाटा रोड, बदलापूर पाईपलाईन रोड, तसेच काटई टोलनाक्याच्या परिसरात हायवेलगत कार सर्व्हिस सेंटर, ढाबे, हॉटेल यांचे प्रशस्त जाळे पसरले असून, अनधिकृत नळ जोडण्यातून या ठिकाणी मनसोक्तपणे पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून ग्रामस्थांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

एमआयडीसीच्या जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून नेवाळी नाका, बदलापूर, अंबरनाथ, खोणी गावाहून, कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये  चोवीस तास पाणी भरून ठेवण्यात येते. अंबरनाथपासून ते शिळफाटा यश सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरात अनेक "कार सर्व्हीस सेंटर" असून या ठिकाणी सेंटरचे मालक बिनधास्तपणे नजीकच्या पाईपलाईनमधून अनधिकृत नळजोडण्या घेऊन आपला खिसा गरम करत आहे. बदलापूरपाईप लाईन रोड तसेच काटई टोलनाका परिसरात काही विशिष्ट अंतरावर असलेले बहुतांश "कार सर्व्हिस सेंटर" हे सत्ताधारी पक्षातील एक पदाधिकारी चालवत असल्याची माहिती एका ग्रामस्थाने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली. परिसरातील हॉटेल,  ढाबे,  भाजीपाला लागवड करणारे शेतकरीही  एमआयडीसीच्या पाईपलाईनच्या पाण्यावर अवलंबून आहेत. 

दरम्यान, या परिसरातील अनेक व्यावसायीक  जलवाहिन्याना छिद्र पाडून त्यामधून चोवीस तास पाणी वापरतात ही बाब  महामंडळाच्या अधिका-यांना आढळून आली होती. त्यानुसार कारवाही सुद्धा करण्यात आली. मात्र, यावर रामबाण उपाय म्हणून जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक  तैनात करण्याचा निर्णयही एमआयडीसिने घेतला होता. मात्र या सर्व  घोषणा  हवेत विरल्या असून सद्यस्थितीतही मोठ्या प्रमाणात  खुलेआम पाणीचोरी होत आहे. त्यामुळे पोलीस आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर परिसरात याअगोदर पाहाणी दौरा करण्यात आला होता व अनधिकृत जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्या होत्या असे उत्तर देण्यात आले. मात्र, वास्तविक पाहता हे कारवाईचे सत्र थंड पडले असून फुकटच्या पाण्यावर व्यावसायिकांना रोज भरभरून लक्ष्मीदर्शनाचा लाभ होत आहे. 

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com