कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्लास्टिक बंदीचा फियास्को

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जागो जागी प्लास्टिक पिशव्याचा कचरा ...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी जाहीर करूनही त्याचा सर्रास वापर केला जात असून ऐन दिवाळीत कल्याण पूर्व च्या अनेक भागात रस्त्यावर कचरा आढळून आला त्यात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश होता, यामुळे पालिकेच्या प्लास्टिक बंदीचा फियास्को झाला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

कल्याण-डोंबिवलीतून प्रतिदिन 650 हुन जास्त टन कचरा जमा होतो. सध्या हा कचरा कल्याण पश्चिम आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड असल्याने या कचऱ्याचे विघटनच होत नाही. त्यामुळे या कचऱ्याचा डोंगर वाढतच चालला आहे. नालेसफाई करताना प्लास्टिक पिशव्या, कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, केंद्र सरकार च्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालात कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक खालावल्याने चांगलीच चर्चा रंगली होती, दरम्यान 50 

 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या बंदी आणत त्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली मात्र ती कागदावरच राहिली आहे असा आरोप सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी केला आहे .दिवाळीचे मागील 4 दिवस आणि आज रविवार ता 22 ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व च्या अनेक भागात कचरा रस्त्यावर साठलेला दिसला त्यात कल्याण पूर्व मधील नव्याने बनत असलेल्या 100 फुटी रस्त्यावर आणि रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले तर त्यात प्लास्टीकचा समावेश होता आणि तो अनेक दिवसापासून न उचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . 

प्लास्टिक पिशव्या बंदी बाबत मागील 2 वर्ष केंद्र सरकार, राज्यसरकार आणि पालिका कडे पाठपुरावा करत आहे, पालिकेची प्लास्टिक बंदी कागदावरच आहे. आमच्या संस्थे मार्फत प्लास्टिक ही खरेदी करतो, पाठ पुरावा करून ही पालिका ठोस अंमलबजावणी करत नसल्याने आता आम्ही लवकरच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती सहयोग सामाजिक संस्था अध्यक्ष विजय भोसले यांनी दिली . 

दिवाळीमध्ये सफाई कर्मचारी वर्गाच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या, प्लास्टिक बंदी बाबत कारवाई सुरू आहे, जनजागृती ही करत आहोत जो पर्यंत प्रत्येक नागरीक पुढाकार घेत नाही तोपर्यंत ही समस्या मिटणार नाही अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.