RC बुकचे कागदी घोडे बंद; आता चालकांना स्मार्ट कार्ड

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

कल्याण आरटीओ पुन्हा झाले स्मार्ट

सन 2007 ते 2016 या कालावधीत वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्डमार्फत दिले जात होते, ते आरसी बुक टिकाऊ आणि सोयीचे होते. त्यावेळी ते 350 रुपयास मिळत असे. मात्र खासगी कंपनीचे काम राज्य शासनाने फ्रेबुवारी 2016 पासून काम थांबविल्याने दीड वर्षांहून अधिक काळ कागदावर आरटीओ मार्फत आरसी बुक मिळत होते.

कल्याण : डिजिटल युगात राज्यातील अनेक आरटीओ प्रमाणे कल्याण आरटीओने वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ( आरसी बुक ) स्मार्ट कार्ड द्वारे सन 2007 मध्ये सुरू झाले मात्र ते योजना बंद झाल्याने आरसीबुक कागदावर देत होते आता पुन्हा कल्याण आरटीओ स्मार्ट झाले असुन गुरुवार पासून वाहनचालकांना स्मार्ट कार्डद्वारे आरसीबुक देण्यास सुरुवात झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

परिवहन विभागाच्या नियमानुसार विविध आरटीओ कार्यालयात वाहनांची नोंदणी होत असते आणि आरटीओ मार्फत वाहनांची नोंद केल्यावर वाहन मालक चालकाला आरटीओ मार्फत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालय डिजिटल झाल्याने अन्य आरटीओ कार्यालयाप्रमाणे कल्याण आरटीओ कार्यालयामार्फत सन 2007 ते 2016 या कालावधीत वाहनांचे आरसी बुक स्मार्ट कार्डमार्फत दिले जात होते, ते आरसी बुक टिकाऊ आणि सोयीचे होते. त्यावेळी ते 350 रुपयास मिळत असे. मात्र खासगी कंपनीचे काम राज्य शासनाने फ्रेबुवारी 2016 पासून काम थांबविल्याने दीड वर्षांहून अधिक काळ कागदावर आरटीओ मार्फत आरसी बुक मिळत होते. त्यामुळे ते सांभाळ करणे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती, तद्नंतर ते आरसी बुक मिळणे ही मुश्किल झाल्याने वाहन चालक मालक त्रस्त झाले होते. यावर्षी दिवाळी पूर्वी आणि नंतर राज्यातील अन्य आरटीओ प्रमाणे कल्याण आरटीओ डिजिटल झाले असून आता आरसी बुक स्मार्ट कार्ड द्वारे मिळणार असल्याने वाहन चालक मालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.  

गुरुवार (ता. 2) पासून कल्याण आरटीओ कार्यालय मधून स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली, यावेळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आय एच मासुमदार, श्री नांदगावकर, रविंद्र कुलकर्णी आदी आरटीओ अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी एका रिक्षा चालकाला स्मार्ट कार्ड आरसीबुक देण्यात आले.

स्मार्ट कार्ड झाले स्वस्त...
सन 2007 ते 2016 या कालावधीत स्मार्ट कार्ड घेणाऱ्याना 350 रुपये द्यावे लागत होते मात्र आता नवीन वाहनाचे स्मार्ट कार्ड आरसी बुक केवळ 200 रुपयात उपलब्ध होणार आहे. मात्र या कार्डाचा दर्जा चांगला आणि कायमस्वरूपी योजना सुरू राहावी अशी माफक अपेक्षा वाहन चालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आहे. नवीन वाहनांची नोंद केलेल्या 200 रुपये शुल्क भरून घरपोच स्मार्ट कार्ड आरसी बुक मिळणार असून रिक्षा चालकांना त्वरित देण्यात येत आहे. जुन्या, डुबलिकेट नव्याने, आरसी बुक स्मार्ट कार्ड द्वारे करायचे असेल 200 रुपये शुल्क सहित अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी 'सकाळ'ला दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :