गणेशोत्सव खरेदीसाठी गर्दी, चार तास खोळंबली वाहतूक

रविंद्र खरात 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

शिवाजी चौक ते महंमदअली चौक व्हाया दीपक हॉटेल परिसर फुलला...
गणेशोसत्व आल्याने त्याकाळात लागणारे साहित्य विक्री करणाऱ्या फेरिवाल्यांनी छोटे मोठे दुकाने थाटल्याने नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याने संथ गतीने वाहतूक सुरु होती. शिवाजी चौकाच्या काही अंतरावर कुंभारवाडा असल्याने तेथे गणपती बाप्पाच्या मूर्ती नेण्यासाठी भक्तांची लगबग सुरु झाल्याने त्या परिसर मधील वाहतूक ही संथ गतीने सुरु होती ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली .

कल्याण : उद्या 25 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे, त्यापूर्वी गणेशोत्सव काळात लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आणि विक्रीसाठी निघालेल्या व्यापारी वर्गाच्या वाहने रस्त्यावर एकाच वेळी उतरल्याने आज (गुरुवार ता. 24 ऑगस्ट) सकाळी 6 वाजल्यापासून कल्याण शिळफाटा रोड, कल्याण वालधुनी रस्ता, दुर्गाडी पुल, शहाड पूल आदी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांना 4 तासांहून अधिक काळ लागला. 

कल्याण हे महत्वाचे शहर आहे, कल्याण पत्रीपूल जवळील कृषि उपन्न बाजार समिती च्या परिसर मध्ये मोठी बाजारपेठ आहे, फूल मार्केट आणि फळ मार्केट असल्याने तेथे सकाळी मोठी मोठी अवजड वाहन येत असतात तर दूसरी कडे उद्या शुक्रवार ता 25 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने अनेकांनी आज गुरुवार ता 24 ऑगस्ट रोजी सकाळी गर्दी केली होती यामुळे कल्याण पत्रीपूल जवळ सकाळी 7 वाजता वाहनांची गर्दी होवू लागली ती बघता बघता कल्याण शिळफाटा रोडवरील टाटा पावर पोहचली तर दूसरी कडे कल्याण मधील शिवाजी चौक, सहजानंद चौक, वालधुनी पूल शहाड पुलावर वाहनाची लांब लचक रांगा लागल्या.

शहरात आणि प्रमुख रस्त्यावर वाहनाची लांबलचक रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीची माहिती मिळताच कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने शहरातील चौकाचौकात आपल्या कर्मचारी वर्गाला पाठवत वाहतूक कोंडी दूर करण्याचा पर्यन्त केला दूसरी कडे कल्याण शिळफाटा रोड वरील डोंबिवलीच्या दिशेने वाहतूक कोंडी झाल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचारी वर्गाचे हाल झाले,  डोंबिवली मधील सामाजिक संघटना ईगल ब्रिगेडचे  विश्वनाथ बिवलकर, चंद्रकांत घाग ,समीर कांबली, संजय गायकवाड़, निलेश चंद्र शेखर, मंदार लेले आदिनी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मदत केली, सुरुवातीला रिक्षा, दुचाकीस्वाराना रांगेत सोडले तदनंतर मोठे वाहन सोडण्यात आले .