अशी ही समाजसेवा : गरीब, अनाथ मुलांना ऊबदार कपडेवाटप...

कल्याण
कल्याण

कल्याण : कल्याण पूर्वमधील सहयोग संस्था ही सामाजिक संस्था मागील 11 वर्षापासून विविध कार्यक्रम राबवत आहे. थंडीचे दिवस सुरू झाल्याने कल्याण स्टेशन परिसरातील गरीब आणि अनाथ मुलाना रविवारी ता 19 नोव्हेंबर रोजी रात्री स्वेटर आणि थंडीमध्ये उपयोगी कपड़े वाटप केले.

कल्याण पूर्व मध्ये मागील 11 वर्ष सहयोग ही सामाजिक संस्था अनाथ आणि गरीब मुलासाठी विविध उपक्रम राबवित आहे, कल्याण पूर्व मध्ये कचरा प्रश्न बिकट असून मोफत कचरा उचलने ही सेवा या संस्थेने सुरु केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.गरीब आणि अनाथ मुलाना थंडीच्या दिवसात त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, प्रदीप भंगाले, भारत सटाळे, मनोज सिंह, अनिल, आदींनी रविवार ता 19 रोजी रात्री उशिरा कल्याण रेल्वे स्थानक परिसर, रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब आणि अनाथ मुलाना स्वेटर सहित थंडीचे कपड़े 100 हुन अधिक जणांना मोफत वाटप केले.

सामाजिक बांधलकी म्हणून आम्ही मागिल 11 वर्ष काम करत आहोत, यावर्षी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भोसले यांच्या स्मरणार्थ गरीब आणि अनाथ मुले समाज पासून दूर गेले असून त्यांना मुख्य प्रवाह मध्ये आणन्या साठी आम्ही प्रयन्त करत आहोत, त्यांचे शिक्षण, त्यांना मदत करत असतो सध्या थंडीचे दिवस असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सुमारे 80 ते 100 मुला मुलीसमवेत जेेष्ठ नागरीकांना ही मदत केल्याची माहिती अध्यक्ष विजय भोसले यानी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com