एल्फिस्टन घटनेनंतर आंबिवलीत पादचारी पुलाचे काम लष्कराकडून सुरू

आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम करताना लष्कराचे जवान कामाची माहिती घेताना प्रवासी संघटना पदाधिकारी 
आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम करताना लष्कराचे जवान कामाची माहिती घेताना प्रवासी संघटना पदाधिकारी 

कल्याण : एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटना नंतर करीरोड, एल्फिस्टन आणि आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल लष्कर करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर प्रत्यक्षात आंबिवली रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या कामाला सोमवार ता 20 नोव्हेंबर सायंकाळपासून लष्कराने सुरुवात केली आहे.

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटना नंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, मध्य रेल्वे स्थानकात कल्याण च्या दिशेने असलेला पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम 8 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले त्याचे काम अंतिम टप्यात असुन तो पादचारी पूल रविवार 20 नोव्हेंबर पासून प्रवाश्यासाठी खुला करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

लष्काराचे जवान आंबिवली मध्ये दाखल...
मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकातील नव्याने उभारण्यात येणा-या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला सोमवार 20 नोव्हेंबर पासून सुरवात झाली असून त्यासाठी लष्कराचे 39 जवान दाखल झाले आहेत. या कामाची देखरेख साठी 
लष्कराचे मेजर अमित मिश्रा यांची नेमणुक केली असून त्यांचे सहकारी श्विजय कदम हे या कामावर दैनंदिन काम पाहत आहेत. हा पादचारी पूल कसारा दिशेला बांधण्यात येणार असून याची प्रस्तावित लांबी 18.29मीटर असून रुंदी 5 मीटर आहे. या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आलेय. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. नवीन पादचारी पूल 50 टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पायऱ्या बांधण्यात येणार आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याचा मते या पादचारी पुलाचे गर्डर चढविण्याचे काम दोन तासाच्या मेगा ब्लाक मध्येही पुर्ण होईल. हा नविन ब्रीज ५० टन वजनाच्या क्षमतेचा उभारण्यात येणार आहे.ही लष्कराची टिम एलफिस्टन व करी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी मनुष्यबळाचा यातून आवश्यकतेनुसार वापर केला जाणार आहे. सध्या ही संपुर्ण टीम कल्याणा येथील प्रतिक्षालयागृहात रहात असून यांची राहण्याची सोय रेल्वे च्या वसाहतीत करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून तो प्रवाश्याना खुला करण्यात आला आहे. कसाराच्या दिशेने असलेला पादचारी पूलाच्या कामाला लष्कराच्या जवांनांनी सुरुवात केली असून तो पूल 31 जानेवारी 2018 पूर्वी प्रवाश्यासाठी खुला करण्याचा प्रयन्त असून प्रवाश्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वे सुनील उदासी यांनी केले आहे.

आज आमच्या पदाधिकारी समवेत लष्कराच्या अधिकारी वर्गाची भेट घेऊन कामाबाबत माहिती घेतली ,त्यांना प्रवासी संघटनेच्या वतीने सहकार्य करूच त्यासोबत लष्कराच्या जवानांना राहण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com