विनयभंग : 49 बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई, तर 3 रिक्षा जप्त

रविंद्र खरात
बुधवार, 21 जून 2017

रिक्षा संघटना बैठक...
कल्याण वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी आज बुधवार ता 21 जून रोजी सकाळी आपल्या दालनात रिक्षा संघटनाची बैठक घेवून एक फार्म वाटण्यात आला त्या फार्म नुसार प्रत्येक रिक्षा चालकाने आपली माहिती रिक्षा मध्ये लावणे कमप्राप्त असून लवकरच याबाबत वाहतूक पोलिसांच्या वतीने याबाबत विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली 

कल्याण : कल्याण शिळफाटा रोड वरील टाटापावर जवळ रविवार ता 18 जून रोजी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षात विनय भंग झाला होता , या घटनेची गंभीर दखल कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त पणे रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई सुरु केली असून आज बुधवार ता 21 जून रोजी 21 रिक्षा विरोधात धड़क कारवाई करत 3 रिक्षा जप्त केल्या आहेत 

रविवारी अल्पवयीन विद्यार्थीनीचा रिक्षात विनयभंग घटना घडली यामुळे महिलांच्या रिक्षा प्रवास प्रश्न चर्चेचा विषय ठरला होता , या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आणि वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांच्या आदेश नुसार आरटीओ चे मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय लाड ,सुभाष धोंडे

अनुज भामरे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जयेश देवरे तर डोंबिवली वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे,  हेमलता शेरेकर आदीच्या पथकाने डोंबिवली पूर्व पश्चिम आणि कल्याण शिळ रस्त्यावर बेशिस्त रिक्षा चालका विरोधात धड़क कारवाई केली , यात लायसन्स नाही , बॅच नसणे , भाड़े नाकारणे अश्या 49 रिक्षा चालका विरोधात करावाई केली तर 16 वर्ष पेक्षा जुन्या रिक्षा असलेल्या 3 रिक्षा जप्त करण्यात आल्या . या धड़क कारवाईने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे . 

आज डोंबिवली मध्ये कारवाई सुरु झाली असून कल्याण आणि डोंबिवली दोन्ही शहरात ही कारवाई पुढील आदेश येई पर्यंत ही मोहिम सुरु राहणार असून रिक्षा चालकांनी आपली कागद पत्र सोबत ठेवण्याचे आवाहन कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सकाळ ला दिली .