महिलांनी केले प्लास्टिक बंद; कचऱ्यापासून खतनिर्मिती

सोमवार, 25 सप्टेंबर 2017

घरात असलेल्या प्लास्टिक पिशव्या त्या जमा करून 2 ऑक्टोबरपूर्वी सहयोग या सामाजिक संस्थेच्या मार्फत जमा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

कल्याण : कल्याण पूर्वमधील लोकवाटीका संकुल मधील महिलांनी नवरात्र निमित्त एकत्र येत संकल्प केला आहे, नवरात्र पासून आप आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करत, ओला कचऱ्यापासून खत निर्मिती तर प्लास्टिक पिशव्या वापरणे पूर्ण बंद करण्यात येणार आहेत.

कल्याण पूर्वमध्ये लोकवाटीका संकुल मध्ये साडे पाचशे हुन अधिक कुटुंब राहतात, नवरात्र निमित्त रविवार ता 24 रोजी सायंकाळी तेथील स्थानिक महिलांनी बैठक घेतली, त्यात पालिकेचे घनकचरा विभाग अधिकारी विलास जोशी, सहयोग सामाजिक संघटना अध्यक्ष विजय भोसले, स्टडी वेव्स संस्थेचे उमाकांत चौधरी, मुंबई मनपा अधिकारी प्रकाश दळवी आदीनी हजेरी लावली, यावेळी प्लास्टिक वापर केल्यामुळे पर्यायवरण हानी, आणि ओला कचरा पासून खत निर्मिती बाबत साधक बाधक चर्चा केली. यावेळी महिलांनी संकल्प केला की नवरात्र सुरू असून याच दिवसात प्लास्टिक वापर बंद करायचा आणि ओला कचरा पासून घरातच खत निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

घरात असलेल्या प्लास्टिक पिशव्या त्या जमा करून 2 ऑक्टोबरपूर्वी सहयोग या सामाजिक संस्थेच्या मार्फत जमा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. लवकरच पालिकेमार्फत तेथील महिलाना ओला कचऱ्यापासून खत निर्मिती बाबत प्रशिक्षण आणि साहित्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी पालिका अधिकारी विलास जोशी यांनी दिले.

मागील एक दोन वर्षापासून शहरात सहयोग या संघटनेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या बंद कराव्यात यासाठी शासन ते पालिका स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, आम्ही दर रविवारी प्लास्टिक ही विकत घेत आहोत आता नागरिकांनी ही पुढाकार घेतला असून आता पालिकेची जबाबदारी आहे की नागरिकांना सहकार्य करत या उपक्रम यशस्वी करण्याचे अशी प्रतिक्रिया सहयोग सामाजिक संघटना अध्यक्ष विजय भोसले यांनी दिली.

 

Web Title: mumbai news kalyan no plastic use, fertilizer production