कल्याण पूर्वेत शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन...

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

शनिवार 4 नोव्हेंबर 2017 सायंकाळी साडे पाच वाजता डोंबिवलीचे शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांचे शिवरायांची युध्दनिती' या विषयावर व्याख्यान होणार असून रविवारी सायं ५ वाजता इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरव करडे यांचे शिवरायाचा आठवावा प्रताप ' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कल्याण : विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची माहिती त्यासोबत शिवकालीन किल्ल्यांचीही माहिती व्हावी या उद्देशाने कल्याण पूर्व मध्ये शनिवार आणि रविवारी दोन दिवसीय शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन शनिवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजक भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे यांनी दिली.

कल्याण पूर्वमध्ये भाजपाच्या वतीने नुतन ज्ञान मंदिर शाळेच्या भव्य सभागृहात वेध इतिहासाचा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन शनिवार ता 4 नोव्हेंबर आणि रविवार 5 नोव्हेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन शनिवार ता4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष तसेच राज्य मंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्ते होणार असून या समयी खासदार कपिल पाटील ,आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, संजय केळकर, महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

शनिवार 4 नोव्हेंबर 2017 सायंकाळी साडे पाच वाजता डोंबिवलीचे शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांचे शिवरायांची युध्दनिती' या विषयावर व्याख्यान होणार असून रविवारी सायं ५ वाजता इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरव करडे यांचे शिवरायाचा आठवावा प्रताप ' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दरम्यान शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच शिवकालीन किल्ले; चित्रकला स्पर्धा पारितोषिक सोहळा ही होणार असून शिवप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक भाजपा सरचिटणीस संजय मोरे यांनी केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :