करण जोसेफ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई -  पियानोवादक करण जोसेफ (वय 29) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडे बुधवारी तपास सोपवण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई -  पियानोवादक करण जोसेफ (वय 29) यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडे बुधवारी तपास सोपवण्यात आला. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

जोसेफ यांनी 8 सप्टेंबरला वांद्रे येथील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. करण हे मूळचे बंगळूर येथील होते. वांद्रे येथील मित्र ऋषी शहा यांच्या घरी ते राहत होते. करणच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी केली होती. ऋषी शहा हे करण यांना जबरदस्तीने एक करार करण्यास भाग पाडत होते. हा करार करण्यास करण इच्छुक नव्हते, असा आरोप करण यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.