कर्जत लोकलचा डबा घसरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (ता. 1) कर्जत लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने मुलुंड ते माटुंगादरम्यान "सीएसएमटी'कडे जाणाऱ्या मंदगती मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता.

त्यामुळे लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येत होत्या. त्याचवेळी "सीएसएमटी'हून सुटलेल्या कर्जत लोकलचा एक डबा दुपारी पावणेदोन वाजता "सीएसएमटी' ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान रुळांवरून घसरला. त्यामुळे "सीएसएमटी'-भायखळ्यादरम्यानची वाहतूक ठप्प झाली. घसरलेला डबा दुपारी चार वाजता रुळांवरून हलवण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. वाहतूक थांबल्याने दादर, भायखळा, कुर्ला या स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.