केडीएमटी उत्पन्नवाढीसाठी बाप्पाला गाऱ्हाणे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कल्याण  -दोन दिवसांनंतर गणपती बाप्पांचे आगमन होणार असून त्यापूर्वीच डोंबिवलीतील नागरिकांना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक परिसरातून केडीएमटी बस सेवेची भेट मिळाली आहे. मंगळवारी (ता.22) मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ झाला. या वेळी परिवहन विभागाला चांगले दिवस यावेत, असे गाऱ्हाणे सभापती संजय पावशे यांनी घातले. त्याला उपस्थितांनी "होय महाराजा' म्हणत साथ दिली. 

डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक परिसरातून केडीएमटी बस सोडाव्यात, अशी मागणी होत होती. त्याला अखेर आज मुहूर्त मिळाला. सभापती संजय पावशे, स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता मंदार हळबे, महाव्यस्थापक देवीदास टेकाळे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित, परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दीक्षित, सुभाष म्हस्के, प्रल्हाद म्हात्रे, मनोज चौधरी, संजय राणे, मधुकर यशवंतराव, प्रसाद माळी, परिवहन विभाग अधिकारी श्‍याम पष्टे, संदीप भोसले व प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवेचा प्रारंभ झाला. या वेळी पूजा करताना सभापती पावशे यांनी मालवणी पद्धतीने गणपती बाप्पाला गाऱ्हाणे घातले. प"रिवहन विभागाची इडापिडा जाऊ दे, प्रशासन अधिकारीवर्गाला सुबुद्धी येऊ दे, उत्पन्न वाढू दे', असे साकडे त्यांनी घालताच उपस्थितांनी "होय महाराजा...' अशी त्यांना साथ दिली. मान्यवरांनी बसने प्रवासही केला. बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सभापती पावशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

श्रेय कोणीही घ्यावे; मात्र शहरातील अनेक भागात बस सोडायच्या आहेत. उत्पन्नवाढीसाठी प्रत्येक सदस्य रस्त्यावर उतरून काम करत आहे. आता प्रशासनने आपले काम करावे. 
- संजय पावशे, सभापती. 

डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातून केडीएमटी बस सोडावी, ही मागणी होती. पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे. आज सुरू झालेली बस प्रशासनाने सुरू ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा. 
- मंदार हळबे, मनसे नगरसेवक आणि पालिका विरोधी पक्षनेता.