बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीबरोबर सेल्फी काढणारे सोमय्या ट्रोल

अक्षय गायकवाड
शनिवार, 13 जानेवारी 2018

नेटिझन्सने उडविली खिल्ली

विक्रोळी : मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यासोबत सेल्फी काढणे खासदार किरीट सोमय्या यांच्या चांगलेच अंगलट आले. आज (शनिवार) नेटिझन्सने त्यांना ट्रोल केले. शिवाय ट्विटरवर बिबट्याचा उल्लेख सोमय्या यांनी टायगर (वाघ) असे केल्याने ते तोंडघशी पडले. यावरून नेटिझन्सने त्यांना फैलावर घेतले.

आज सकाळी साडेसात च्या सुमारास बिबट्याने एकूण पाच जणांना हल्ला करून जखमी केले. याची महिती मिळताच स्थानिक खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तिथे ते सेल्फी काढण्यात गुंतले. त्यासाठी त्यांनी जमलेले नागरिक आणि जखमी झालेल्या व्यक्ती यांना सोबत घेतले.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी ते फोटो ट्विट केले. त्यांच्या या असंवेदनशीलपणावर त्यांना ट्रोल केले गेले. तसेच ट्विट करताना सोमय्या यांनी बिबट्याचा उल्लेख वाघ म्हणून केला. त्यामुळे त्यांना वाघच दिसतो का ? टायगर अभी जिंदा हे असे म्हणत ट्रोल केले गेले. यावर, मला तिकडच्या लोकांनी सांगितले की 2 वाघ शिरले होते म्हणून मी ते ट्विट केले अशी सारवासारव सोमय्या यांनी केली.

रितेश करकेरा यांनी सोमय्या यांना सेल्फी ऑफ तर इयर दिला पाहिजे असे ट्विट केली. डोके ठिकाणावर आहे का? असे ट्विट रोहित जोशी यांनी केले. सोमय्यां यांनी जखमीचे काढलेले फोटो पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत.

यापूर्वी मुंबईत जेव्हा एल्फिन्स्टन रोड पादचारी पुलावर चेंगराचेंगरीत 22 जण मरण पावले होते, त्याच रात्री सोमय्या गरबा खेळत होते, असाही आरोप झाला होता.

Web Title: mumbai news kirit somaiya selfie with leopard attackers