मुंबई: फिल्मसिटीत अखेर 49 दिवसांनी बिबट्या जेरबंद

नेत्वा धुरी
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

विहान गरूडा या मुलावर फिल्मसिटी येथील हेलिपेड येथे बिबट्याने 25 जुलै रोजी हल्ला केला. हा हल्ल्यात विहानचा म्रुत्यू झाल्यानंतर वनविभागाने फिल्मसिटीत दोन पिंजरे लावले. बिबट्या पिंज-याजवळ यावा म्हणून मादी बिबट्याचे मलमूत्रदेखील पिंजऱ्यावर शिंपडले.

मुंबई: फिल्मसिटीत विहान गरूडा या अडीच वर्षीय मुलावर हल्ला करणाऱ्या नर बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. बुधवारी (ता. 13) मध्यरात्री एक वाजता बिबट्या फिल्मसिटीत वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात कैद झाला. गेल्या 49 दिवसांपासून या नर बिबट्याला पकडण्याचे ऑपरेशन सुरू होते. परंतु, दरवेळी बिबट्या चकमा देत होता.

विहान गरूडा या मुलावर फिल्मसिटी येथील हेलिपेड येथे बिबट्याने 25 जुलै रोजी हल्ला केला. हा हल्ल्यात विहानचा म्रुत्यू झाल्यानंतर वनविभागाने फिल्मसिटीत दोन पिंजरे लावले. बिबट्या पिंज-याजवळ यावा म्हणून मादी बिबट्याचे मलमूत्रदेखील पिंजर्यावर शिंपडले. मादीच्या शोधात बिबट्या पिंज-यात येईल आणि अडकला जाईल, अशी शक्क्ल  वनविभागाने लढवली. परंतु, बिबट्या पिंजर्याजवळ फिरलादेखील नाही.

फिल्मसिटीत वनविभागाने लावलेल्या सीसीटिव्ही कॅम-यातूनही बिबट्या दिसेनासा झाला. त्याचदरम्यान आरेत बिबट्या दिसून येत असल्याचे वनविभागाला समजले. वनविभागाने फिल्मसिटीतील एक पिंजरा आरेत हलवला. परंतु, आरेतही वनविभागाच्या पिंज-यात बिबट्या येईना. अखेर बुधवारी रात्री बिबट्या पिंज-यात अडकला. यंदाच्या वर्षांत मुंबईत बिबट्याचे पाच हल्ले झाले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स