कायदा विषयाच्या निकालाचा श्रीगणेशा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

एलएलएम सत्र तीनचा निकाल लावला; केवळ तीस विद्यार्थी उत्तीर्ण; उत्तीर्ण टक्का केवळ 30.93 %

मुंबई - कायदा विषयाचा निकाल लावायला अखेर मुंबई विद्यापीठाला गुरुवारपासून मुहूर्त मिळाला. केवळ एकशे शहात्तर विद्यार्थी संख्या असलेल्या एलएलएम सत्र तीनचा निकाल मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री नऊ वाजता जाहीर केला. एलएलएम सत्र तीनच्या परीक्षेला एकशे अठरा विद्यार्थी हजर होते. त्यापैकी केवळ तीसच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलएलमचा केटीचा निकाल घसरल्याने विद्यार्थी संघटना चांगलीच संतापली आहे. 

निकाल एवढा घसरला असेल तर पुनर्मूल्यांकन मोफत असायला हवे, अशी मागणी स्टुडण्ट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली. केटीचा निकाल जाहीर करुन विद्यापीठ पुन्हा फसवेगिरी करत असल्याचे टीका पवार यांनी केली. तुम्ही नियमित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करा, त्यातही नापास विद्यार्थ्यांचा टक्का घसरला असल्यास ऑनस्क्रीन असेसमेंट प्रक्रिया नापास असेल. एवढी मोठी नापास विद्यार्थी संख्या असेल तर पूनर्मूल्यांकन मोफतच असावे, असेही पवार म्हणाले. 

सध्या मुंबई विद्यापीठाकडून सहाच निकाल जाहीर केले जात आहेत. अजूनही एकशे सत्तर निकाल जाहीर करणे बाकी आहेत. गुरुवारीही मध्यरात्री दहापर्यंत सातच निकाल जाहीर केले गेले. 

एलएलएम सत्र तीनचा निकाल 

एकूण विद्यार्थी - 176 

परीक्षेला हजर राहिलेले विद्यार्थी - 118

गैरहजर विद्यार्थी - 58

उत्तीर्ण - 30

अनुत्तीर्ण - 67

आरक्षित निकाल - 2

 इतर कारणांमुळे आरक्षित  - 19

टॅग्स

मुंबई

मुंबई: अश्विन शुद्ध पक्ष प्रतिपदा आदिशक्ति दुर्गा मातेच्या महोत्सवास दक्षिण मुंबईत वरुणाच्या जलाभिषेकाने हर्षोल्हासात आज (गुरुवार...

04.27 PM

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM