मुंब्रा, कळवा स्थानकात 'मेगा ब्लॉक'सोबत 'रेन ब्लॉक'मुळे प्रवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

कळवा (मुंबई) - मध्य रेल्वे प्रशासनाने आज (रविवार) सहा तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला असतानाच शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कळवा व मुंब्रा स्थानकात तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आला आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच प्रवाशांना मेगा ब्लॉक सोबतच पावासाच्या "रेन ब्लॉक'ला ही सामोरे जावे लागले.

ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात काम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने धीम्या गतीच्या मार्गावर सहा तासाचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. दरम्यान शनिवारी मध्यरात्री कळवा मुंब्रा परिसरात कोसळलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेच्या कळवा व मुंब्रा स्थानकात पाणी शिरले. मेगा ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असतानाच पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यामुळे कळवा रेल्वे स्थानक गर्दीने भरून गेला होता. रेल्वे व ठाणे महापालिकेने केलेला नाले सफाईचा दावा फोल ठरला आहे.

शनिवारी रात्री संथ गतीने पडणारा पाऊस मध्यरात्री दोनच्या सुमाराला कळवा व ठाणे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कळवा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या नाल्याला प्रचंड पूर आल्याने सकाळी सहाच्या सुमारास ट्रॅकवर 3 ते 4 फूट पाणी साचले. शिवाय येथील न्यू शिवाजी नगर परिसरातील झोपड्यामध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तसेच रात्रभर पडलेल्या पावसामुळे कळवा खाडी किनारी असलेल्या जानकी नगर, महात्मा फुले नगर परिसरातील भीमनगर, सायबा नगर या परिसरातील झोपड्यामध्ये नाल्यांचा पाणी शिरले महापालिकेने शंभर टक्के केलेल्या नाले सफाईचा दाव्याचा पहिल्याच जोराच्या पावसात पोल खोल झाली आहे.