मुंबई - महाराष्ट्र कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण-2015 जाहीर करण्यात आले. राज्यभरातील 51 कामगारांची गुणवंत पुरस्कारासाठी, तर एकाची कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कामगार भूषण पुरस्कारासाठी औरंगाबादचे महेश यशवंतराव सेवलीकर यांची निवड झाली. पुणे जिल्ह्यातील गुणवंत कामगार कल्याण पुरस्कर्ते पुढीलप्रमाणे- विकास शिवाजी कोरे, रवींद्र बाळकृष्ण कुलकर्णी, बाळासाहेब शामराव डेरे, बाळकृष्ण महादेव गोपाळे, संजय जीवन साळुंखे, सुनील सवाजी कुटे, किशोरकुमार एकनाथ शिंदे, दत्तात्रय नामदेव येळवंडे, कृष्णा सुखदेव ढोकले, श्रीकांत माधव भुते, महेश कृष्णा मेस्त्री, गुरुदेव शिवाजी सरोदे, हनमंत किसन माळी यांचा समावेश आहे.
|