काँग्रेस, राष्ट्रवादीने मला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवले!

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मी निर्दोष आहेः सुधाकर चतुर्वेदी

मुंबई: 2008साली झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सात दिवसांपूर्वी जामीनावर सुटलेला आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने मी निरपराध असून, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विनाकारण बॉम्बस्फोट प्रकरणात गोवल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे.

मी निर्दोष आहेः सुधाकर चतुर्वेदी

मुंबई: 2008साली झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सात दिवसांपूर्वी जामीनावर सुटलेला आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने मी निरपराध असून, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने विनाकारण बॉम्बस्फोट प्रकरणात गोवल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे.

मला अडकवण्यामागे जिहादी आतंकवादी कारवायात सुरक्षा यंत्रणेने मुसलमान आरोपींना अटक केल्यानंतर मुस्लिमांमधील वाढती नाराजी लक्षात घेऊन मुसलमानांना खुष करण्यासाठी देशात 'हिन्दू दहशदवाद अस्तित्वात आहे', हे सिद्ध करण्याचे षडयंत्र तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकारने रचल्याचा आरोप केला आहे. या आरोपात तथ्य आणि सत्यता असल्याचे सांगत माहिती अधिकारात प्राप्त कागदोपत्री पुरावे पत्रकारांसमोर सादर केले.

मुंबई प्रेस क्लब येथे हिन्दू विधीज्ञ परिषद आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मी केलेल्या आरोपांचे आणि माहिती अधिकारांत प्राप्त माहिती पुरावा म्हणून स्विकारुन NIA (राष्ट्रिय तपास यंत्रणा) यांनी चौकशी करावी आणि तत्काळ सरकार मधील दोषी तसेच मला या प्रकरणात गोवणाऱ्या राजकीय नेते आणि पोलिसांवर कारवाई करावी. पोलिस आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदचा अटकेत असलेला भाऊ इब्राहिम कासकर याच्या चौकशीची माहिती कोणालाही कळू देत नाही. त्याला वाचविण्याचे काम करीत आहे. त्याची ब्रेन मैपिंग का करीत नाही. मालेगाव प्रकरणातील ATS ने विमानाने सोबत नेलेला आरोपी 'संग्रामसिंग'चे गूढ़ कायम असून, त्याबद्दल ATS माहिती लपवित आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :